मार्टीन ल्‍युथरच्‍या बायबलची शपथ...

वेबदुनिया

मंगळवार, 20 जानेवारी 2009 (16:33 IST)
जर गेल्‍या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कोणीही स्‍वस्‍थ बसू शकत नाही. आपल्‍याला खंबीर आणि बलशाली जगाची निमिर्ती करायची आहे. आपण आपल्‍यातील मतभेद विसरून एकत्र येऊया असे आवाहन शपथविधी समारंभापूर्वी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक हुसैन ओबामा यांनी केले आहे.

शपथविधीपूर्वीच्‍या भाषणात मार्टीन ल्युथर किंग यांची आठवण करून देत म्हणाले, की त्‍यांनी दाखविलेल्‍या मार्गावरून आपल्‍याला पुढे चालत जायचे आहे. ओबामा मंगळवारी मार्टीन ल्यूथर किंग यांच्या बायबलवर हात ठेऊन शपथ घेणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा