ओबामा अपेक्षांचा नवा सुर्यः मंडेला

वार्ता

बुधवार, 21 जानेवारी 2009 (11:45 IST)
ओबामा हे जगभरातील कोट्यवधी काळ्या लोकांसाठी आशा आणि अपेक्षांचा दिवस घेऊन येणारा नवा सुर्य असल्‍याचे मत दक्षिण आफ्रीकेचे माजी राष्ट्राध्‍यक्ष आणि अश्वेत क्रांतिचे प्रणेते नेल्सन मंडेला यांनी व्‍यकत केले आहे. अमेरिकेच्‍या 44 व्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदी विराजमान झाल्‍याबद्दल त्‍यांनी ओबामांना शुभेच्‍छा दिल्या आहेत.

ओबामांच्‍या शपथ विधी समारंभानंतर दिलेल्‍या प्रतिक्रियेत म्‍हटले आहे, की हा क्षण अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी अविस्‍मरणीय असल्‍याचे म्‍हटले आहे. आजचा हा क्षण त्‍या प्रत्‍येक क्षणाची आठवण करून देणारा आहे, जेव्‍हा द. आफ्रिकेतही रंग आणि वर्णभेद संपत जाऊन लोकशाही राष्‍ट्राची निर्मिती झाली होती. सामूहिक प्रयत्‍नांतून अन्‍याय नष्‍ट करता येतो आणि आयुष्‍य पुन्‍हा उभारता येते हाच संदेश यातून मिळत असल्‍याचे सांगून त्‍यांनी ओबामा हे धैर्यवान आणि स्वप्न सत्‍यात उतरविणारा तरुण नेता असल्‍याचे म्‍हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा