राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या या शपथविधी समारंभात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून त्यासाठी काही रस्ते तसेच मेट्रोचे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे 20 लाख अमेरिकन नागरिक उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षेसाठी काही हवाई मार्गही बंद करण्यात आले आहेत. तटरक्षक दल या दरम्यान गस्त घालणार आहे तसेच हेलिकॉप्टर काही लढाऊ विमाने सुरक्षेसाठी हवेत घिरट्या घालणार आहेत.