ओबामांचा 'डुप्लिकेट'

वार्ता

सोमवार, 19 जानेवारी 2009 (14:35 IST)
इंडोनेशियातील 34 वर्षाचा इल्मम अदनान नावाचा छायाचित्रकार सध्या भलताच चर्चेत आहे. आणि का असू नये. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा आणि अदनानमध्ये दिसण्यात खूपच साम्य आहे. अदनान म्हणजे डिट्टो ओबामा आहे.

त्यामुळे देशभर सध्या कुठल्या ना कुठल्या मासिकात त्याचा फोटो छापून येत असतो. अनेक जण त्याच्या मुलाखतीही घेत आहेत. अदनानला याची गंमत वाटते आहे. त्याचा व्यवसायही यामुळे पहिल्यापेक्षा दुप्पट झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा