असा असेल शपथविधी कार्यक्रम

भाषा

मंगळवार, 20 जानेवारी 2009 (16:06 IST)
अमेरिकन इतिहासात चिरस्‍मरणीय राहणा-या दिवसाचा सूर्य अवघ्‍या काही तासात उगवणार असून देशाच्‍या सर्वोच्‍च पदावर पहिला अश्‍वेतवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष म्‍हणून बराक ओबामा शपथ ग्रहण करणार आहेत. या ऐतिहासिक समारंभासाठी व्हाइट हाऊस सज्ज झाले आहे. देशाच्‍या 44 व्‍या राष्ट्राध्‍यक्षपदी ओबामा शपथ घेणार आहेत.

शपथविधी समारंभापूर्वी ओबामा दाम्‍पत्‍य सकाळी वॉशिंग्‍टनच्‍या ऐपिस्कोपल चर्चमध्‍ये प्रार्थना करतील. त्‍यानंतर औपचारिक कार्यक्रमास सुरुवात होईल. त्‍यानुसार व्हाइट हाऊसच्‍या अतिथी कक्षातून ओबामा राष्ट्राध्‍यक्ष निवास परिसरात नॉर्थ पोर्टिको येथे पोचतील. तेथे बुश त्‍यांचे स्वागत करतील. त्‍यानंतर दोन्‍ही नेते कॅपिटल बिल्डिंगमध्‍यील शपथ ग्रहण समारंभासाठी रवाना होतील.

सकाळी साडे अकरा वाजता सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश जॉन पॉल स्टीव्‍हन्‍स हे सुरूवातीला बिडेन यांना उपराष्ट्राध्‍यक्ष पदाची शपथ देतील. 11 वाजूने 55 मिनिटांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट ओबामा यांना शपथ देतील. त्‍यानंतर लगेचच राष्‍ट्राध्‍यक्ष ओबामा राष्‍ट्राला संबोधून भाषण करतील. तर बूश यांची आठ वर्षाची कारकिर्द संपुष्‍टात येईल.

वेबदुनिया वर वाचा