ठाण्यातील ए. के. जोशी इंग्लिश शाळेत स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण आढळल्याने पालकांनी सोमवारी शाळेला घेराव घालून व्यवस्थापनास शहरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि कोपरीतील पिपल्स एज्यूकेशन इंग्रजी माध्यमाची शाळा आठवडाभरासाठी बंद ठेवण्यास निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
नौपाडा परिसरातील ए. के. जोशी शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणिता कुलकर्णी या चिमुरडीला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने तिला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे वृत्त शाळेत धडकताच सोमवारी पालकांनी शाळेला घेराव घालून शाळा बंद पाडली. मात्र, शाळेचे संस्थापक डॉ. विजय बेडेकर यांनी पालकांची समजूत घालताना, प्रणिता ही विद्यार्थिनी गेले नऊ दिवसांपासून शाळेत गैरहजर असल्याने नाहक चिंता करु नये असे सांगून १६ ऑगस्ट पर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले.
दरम्यान, स्वाईन फ्लूच्या धास्तीने ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि कोपरीतील पिपल्स एज्यूकेशन सोसायटीच्या इंग्लिश माध्यमांची शाळाही आठवडाभर बंद ठेवून दक्षता घेणार असल्याने आतापर्यंत इतर शाळांबाबतही योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्याचे सांगितले आहे.