नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||
कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||
कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही | अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||