श्री स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली
सोमवार, 6 मे 2024 (12:53 IST)
पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा
ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा ।
मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी ॥
देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥
आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा । साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा ।
स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा ।।
दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥
धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही ।
तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि ।
भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा
होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥
विधीहरिहर हे एकरूपे मिळाले । परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले ।
अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं ।
तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥
परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा ।
लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा ।
ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा ।
अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥
ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा ।
ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा ।
भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा ।
गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥