Aaj Gokulat Rang Khelto Hari / आज गोकुळात रंग खेळतो हरी
गीतकार : सुरेश भट, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी
सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी
त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी
पुढे पहा : आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या
Aaj udas udas door pangalya saoolyaa / आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या
गीतकार : ना. धो. महानोर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
पुढे पहा : आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात
Aali hasat pahili raat / आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात
गीतकार : , गायक : लता मंगेशकर, संगीतकार : , चित्रपट : शिकलेली बायको
आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात
प्रकाश पडता माझ्यावरती, फुलते बहरुन माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात
आली हासत पहिली रात ...
मोहक सुंदर फूल जीवाचे, पती चरणांवर प्रीत अर्पिता
मिलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात
आली हासत पहिली रात ...
लाजबावरी मी बावरता, हर्षही माझा बघतो चोरुन
भास तयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात
आली हासत पहिली रात ...
पुढे पहा : ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
Airanichhya deva tula / ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : साधी माणसं - 1965
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे
पुढे पहा : अखेरचा हा तुला दंडवत
Akhercha ha tula dandwat / अखेरचा हा तुला दंडवत
गीतकार : गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : मराठा तितुका मेळवावा - 1964