बॉलीवूड 2015: अभिनेत्रींचा स्कोरकार्ड

कॅटरिना कैफ
सध्या कॅटरिनाचे सिनेमा मुळीच लक्ष लागत नाहीये. तिला तर फक्त रणबीरबरोबर लग्न करून संसार थाटायचा आहे. दोघांचा नात्याबद्दल चर्चा सुरूच आहे. एकूण कॅटरिनाचा 2015 मध्ये फक्त एक चित्रपट प्रदर्शित झाला असून तो बुडाला असं म्हटलं तरी हरकत नाही.

रिलीज : 1  (फँटम)
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
सामान्य : 0
फ्लॉप : 1 


प्रियांका चोप्रा
प्रियांकाचे मन बॉलीवूडमध्ये कमी आणि क्वांटिको नावाच्या अमेरिकन टीव्ही मालिकेत अधिक रमले आहे. तिथून वेळ मिळाल्यावरच ती भारतात येते. ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि दर्शक तिला अधिक बघू इच्छित असतात. या वर्षी प्रियांकाचे दोन चित्रपट रिलीज झाले- दिल धडकने दो आणि बाजीराव मस्तानी. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकेत वेगळा रंग होता. सध्या बाजीराव मस्तानीचा बॉक्स ऑफिस परिणाम येणं शेष आहे.
 
रिलीज : 2  (दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी)
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
सामान्य : 0
फ्लॉप : 1


दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण उत्कृष्ट अभिनय करत लागोपाट हिट चित्रपट देण्यासाठी लोकप्रिय झाली आहे. 'पीकू' सिनेमात अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांच्या सारख्या दिग्गज कलावंताच्या उपस्थितदेखील तिनी आपला अभिनयाने सिनेमा गाजवला. तर इकडे 'बाजीराव मस्तानी' मध्ये ती सुंदरच दिसली नव्हे तर मस्तानीच्या भूमिकेत अशी उतरली की तिच्या अभिनयाने दर्शकांचे हृदयाला स्पर्श केले.
 
रिलीज : 3  (पीकू, तमाशा, बाजीराव मस्तानी)
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 1 
सामान्य : 0
फ्लॉप : 1


करीना कपूर 
करीना कपूर अता असे चित्रपट करायला लागली ज्यात मेहनत कमी आणि चांगले परिणाम मिळण्याची गारंटी असेल. म्हणूनच तिला मोठ्या कलाकारांसोबत काम करायला आवडतं. प्रमुख भूमिकेत तिची फक्त 'बजरंगी भाईजान' रिलीज झाली. तसेच 'ब्रदर्स' मध्ये 'मेरा नाम मैरी है' यावर सेक्सी नृत्य प्रस्तुत करून तिने दर्शकांना वेड लावले आणि 'गब्बर इज बैक' मध्ये कॅमियो भूमिका साकारली.
 
रिलीज : 1  (बजरंगी भाईजान)
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 0 
सामान्य : 0
फ्लॉप : 0


कंगना राणावत
या वर्षी कंगनाचे दोन चित्रपट बुडाले असले तरी 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' मध्ये तिनी अशी काही धमाल उडवली आहे की सर्वसामान्य प्रेक्षक ते चित्रपट समीक्षक पर्यंत सर्व हैराण झाले. एकाच अभिनेत्रीने दोन वेगळ्या वेगळ्या भूमिका इतक्या सहजपणे साकारल्या की सर्व बघतंच बसले. अर्थातच योग्य निर्देशक असल्यास कंगना कमाल करते.
 
रिलीज : 3  (तनु वेड्स मनु, आई लव एनवाय, कट्टी बट्टी)
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 0
फ्लॉप : 2


सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा वर्ष 2015 मध्ये जणू गायबच होती. वर्षाच्या सुरुवातीला तिने 'तेवर' दाखविण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरली. 'ऑल इज़ वेल' मध्ये तिने एक गाणं गायलं. इतर चर्चेतही ती नाहीशी होती. 
 
रिलीज : 1 (तेवर)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 0
फ्लॉप : 1


श्रद्धा कपूर 
सलग तीसर्‍या वर्षी श्रद्धा कपूरने हिट चित्रपट दिले. एबीसीडी 2 मध्ये तिची जोडी वरूण धवनसह होती आणि दर्शकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.
 
रिलीज : 1  (एबीसीडी 2)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 1  
सामान्य : 0
फ्लॉप : 0


आलिया भट्ट 
तरुणांची आवडती आलिया भट्टचे फक्त एक चित्रपट रिलीज झाले असून ते मुळीच शानदार नव्हते. आपल्या आवडत्या हीरो शाहिद कपूरसह 'शानदार' सिनेमा पूर्णपणे बुडाला.
 
रिलीज : 1  (शानदार)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 0
फ्लॉप : 1


सनी लियोन
सिनेमात सनी लियोनने काही विशेष केलं नसले तरी तिची डिमांड खूप आहे. ती गूगलवर सर्वाधिक सर्च झालेली स्टार आहे. याबाबतीत तर तिने दिग्गज लोकांनादेखील मागे टाकले आहेत.
 
रिलीज : 2 (एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 1
फ्लॉप : 1


ऐश्वर्या राय-बच्चन
ऐश्वर्याचे चाहते आतुरतेने तिच्या कमबॅकची वाट बघत होते आणि या वर्षी तिचा जज्बा चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
 
रिलीज : 1  (जज्बा)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 0
फ्लॉप : 1


अनुष्का शर्मा 
एनएच 10 सिनेमा अनुष्काने आपल्या सामर्थ्यावर हिट केला. तिनी केवळ चित्रपटात अभिनय केला नसून त्याची निर्मितीदेखील केली. बॉम्बे वेलवेटसाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली होती पण हा चित्रपट या वर्षीचा सर्वात फ्लॉप चित्रपट सिद्ध झाला. एकूण हे वर्ष अनुष्कासाठी मिश्रित राहिलं.
 
रिलीज : 3 (एनएच 10)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 1  
सामान्य : 0
फ्लॉप : 2 


जॅकलिन फर्नांडिस
मागल्या वर्षी 'किक' सारखी ब्लॉकबस्टर सिनेमा देणार्‍या जॅकलिन फर्नांडिससाठी हे वर्ष चांगले नव्हते. तिने तर फ्लॉप चित्रपटांची हॅट्रिकच लावली.
 
रिलीज : 3 (रॉय, बंगिस्तान, ब्रदर्स)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0  
सामान्य : 0
फ्लॉप : 3


सोनम कपूर 
सोनम कपूरचे हे वर्ष सलमान खानच्या कुटुंबासोबत गेले. अरबाज खानच्या 'डॉली की डोली' मध्ये ती नायिका होती आणि 'प्रेम रतन धन पायो' मध्ये सलमानची नायिका. यातून तिला वेळ मिळाला असावा ज्यात तिने हृतिक रोशनसोबत 'धीरे धीरे' हे म्युझिक व्हिडिओ केले.
 
रिलीज : 2 (डॉली की डोली, प्रेम रतन धन पायो)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 1  
सामान्य : 0
फ्लॉप : 1 


विद्या बालन 
नायिका म्हणून विद्या बालनच्या करियरचा शेवट आला आहे. अता सिनेमात तिचे मन रमत नाही. तिचा एकच चित्रपट रिलीज झाला असून तो पूर्णपणे बुडाला.
 
रिलीज : 1  (हमारी अधूरी कहानी)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0 
सामान्य : 0
फ्लॉप : 1


बिपाशा बसु
काय हे गृहीत धरले पाहिजे की बिपाशा बसुचे करियर संपले? कारण असेच आहे. अता तर तिला चित्रपट मिळणे बंद झाले आहेत. अता ती आपल्या मित्रांसोबत सुट्ट्या घालवताना दिसतं असते. फुरसतीत आहे तर अजून काय करणार...या वर्षी ती फक्त एकाच चित्रपट दिसली आणि ती पण फ्लॉप.
 
रिलीज : 1  (अलोन)
ब्लॉकबस्टर : 0 
सुपरहिट : 0
हिट : 0 
सामान्य : 0
फ्लॉप : 1

वेबदुनिया वर वाचा