लता मंगेशकर यांची टॉप 10 मराठी गाणे

Aaj Gokulat Rang Khelto Hari / आज गोकुळात रंग खेळतो हरी

गीतकार : सुरेश भट, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,

 आज गोकुळात रंग खेळतो हरी

राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
 
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी
 
सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी
 
त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी
पुढे पहा : आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या 

Aaj udas udas door pangalya saoolyaa / आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या 

गीतकार : ना. धो. महानोर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
 
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
 
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
 
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी 
पुढे पहा : आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात

 


Aali hasat pahili raat / आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात

 गीतकार : , गायक : लता मंगेशकर, संगीतकार : , चित्रपट : शिकलेली बायको

आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात
प्रकाश पडता माझ्यावरती, फुलते बहरुन माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात
आली हासत पहिली रात ...
 
मोहक सुंदर फूल जीवाचे, पती चरणांवर प्रीत अर्पिता
मिलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात
आली हासत पहिली रात ...
 
लाजबावरी मी बावरता, हर्षही माझा बघतो चोरुन
भास तयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात
आली हासत पहिली रात ...
 
पुढे पहा : ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे

Airanichhya deva tula / ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : साधी माणसं - 1965

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
 
लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे
 
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे
 
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे
पुढे पहा : अखेरचा हा तुला दंडवत

Akhercha ha tula dandwat / अखेरचा हा तुला दंडवत

गीतकार : गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : मराठा तितुका मेळवावा - 1964

 
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव
 
तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव
 
हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी ना उरला वाली आता, धरती दे गं ठाव
 
पुढे पहा : अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत

Anamveera jithe jahla / अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत

गीतकार : कुसुमाग्रज, गायक : लता मंगेशकर 

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त 
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
 
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी 
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 
 
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा 
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा 
 
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव 
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव 
 
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान 
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान 
 
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा 
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा 
पुढे पहा : आनंदवनभुवनी

Ananadvanbhuvani / आनंदवनभुवनी

 गीतकार : संत रामदास, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी
 
त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडीली मोठी, आनंदवनभुवनी
 
येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी
 
भक्तासी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तासी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी
 
येथूनी वाचती सर्वे
ते ते सवर्त्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी
 
उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी
 
बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी
 
पुढे पहा : आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

Anandi anand gade / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

 गीतकार : बालकवी, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
 
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे
 
वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे
 
पुढे पहा : ई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला

ai bai man moracha / बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला गीतकार : , गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : मोहित्यांची मंजुळा

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला
चिमणी मैना, चिमणा रावा
चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा
चिमणी जोडी, चिमणी गोडी
चोच लाविते, चिमण्या चार्‍याला
चिमणं, चिमणं, घरटं बांधलं चिमण्या मैनेला
 
शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला, त्याच्या पायाला
रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला
गोजिरवाणी, मंजूळगाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकून गान्याला
 
पुढे पहा : बाळा होऊ कशी उतराई

Bala hou kashi / बाळा होऊ कशी उतराई

 गीतकार : पी. सावळाराम, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : वसंत प्रभू

बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई
 
तुझ्या मुखाचे चुंबन घेता
हृदयी भरते अमृत सरीता
तव संजीवन तुला पाजिता
संगम होता उगमा ठायी
गाई झुरु झुरु तुज अंगाई
 
माय भुकेला तो जगजेठी
तुझ्या स्वरुपी येऊन पोटी
मंत्र आई जपता ओठी
महान मंगल देवाहून मी
मातृ दैवत तुझेच होई
पुढे पहा : असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ

 
WD

 

  Asaa bebhaan ha waara / असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ

गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
 
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ
 
जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू
 
कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू
 
जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ.

वेबदुनिया वर वाचा