नागेश कुकनूर

नागेश कुकनूरने बोटावर मोजण्यातकेच परंतु, दर्जेदार चित्रपट केले आहेत. अप्रतिम कलाकृती सादर करून तो आज प्रमुख दिग्दर्शकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. हैदराबादमध्ये जन्मलेला नागेश 1988 मध्ये शिक्षणासाठी अटलांटाला गेला.

तेथे शिक्षण घेऊन नोकरी करून त्याने पैसे जमवले. ते घेऊन तो परत भारतात आला. येथे आल्यावर वर्षभरात चित्रपट निर्मितीचे तंत्र शिकून घेतले. यानंतर त्याचा पहिला चित्रपट आला, तो हैदराबाद ब्ल्यूज. अमेरिकेत राहून आलेला तरूण भारतातील मुलीशी लग्न करण्याची इच्छा बाळगतो.

त्यासाठी तो भारतात येतो. येथे आल्यानंतर दोन संस्कृतींमध्ये त्याला जाणवणारे अंतर नर्मविनोदी शैलीत मांडणारा हा चित्रपट अभिजनवर्गाला खूप आवडला. अगदी कमी बजेटमध्ये हा चित्रपट बनला. अवघ्या सतरा दिवसात चित्रीकरण आटोपले.

चित्रपटात मुख्य भूमिका त्याचीच आहे. त्यानंतर आलेला 'रॉकफोर्ड' ही यशस्वी ठरला. अगदी साध्या घरातला मुलगा मनात हिंमत असेल तर भारतीय क्रिकेट संघातही स्थान मिळवू शकतो ही कथा सांगणारा त्याचा 'इक्बाल' हा चित्रपटही हीट ठरला. समीक्षकांचीही त्याला दाद मिळाली. नुकताच आलेला डोरही त्याच्या वेगळ्या कथेमुळे स्मरणात राहिला.


नागेश कुकनूर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट ः

हैदराबाद ब्ल्यूज, रॉकफोर्ड, बॉलिवूड कॉलिंग, तीन दिवारें, इक्बाल, डोर.

पुरस्कार ः हैदराबाद ब्ल्यूज- प्रेक्षकांचा पुरस्कार, पेचाट्री आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अटलांटा,
प्रेक्षकांचा पुरस्कार, रोड आयलंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
तीन दिवारे- उत्कृष्ट कथानकाचा फिल्मफेअर पुरस्कार (२००३)

वेबदुनिया वर वाचा