'दुर्गा खोटे' - सदाबहार अभिनेत्री

IFM
मूक चित्रपटांपासून ते आधुनिक चित्रपटांपर्यतच्या प्रवासात मुगले आजम, बावर्ची अशा स्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे यांची आज जयंती... चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते.

पारंपरिकतेला चिटकून असणा-या ब्राह्मण परिवारात 14 जानेवारी 1905 रोजी जन्माला आलेल्या दुर्गा खोटे यांच्यावर लहान वयातच परिस्थितीनेही घाला घातला. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्या विधवा झाल्या. दोन मुलांना सांभाळण्‍यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचा मार्ग स्विकारला.

दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा 1932 मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या ‍चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.

त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत माडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. 1930 च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.

चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्‍याजोगा होता.

1931 मध्ये सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अनेक शतक प्रेक्षकांना सुखावत राहिला. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्‍यात आले.

नायिकेच्या भूमिकांनंतर त्यांनी रंगवलेल्या चरित्र भूमिका प्रेक्षकांना भावल्या. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला. 22 सप्टेंबर 1991 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या या प्रवासात त्यांनी चित्रपटातील महिला कलाकारांना दर्जा प्राप्त करून दिला.

वेबदुनिया वर वाचा