महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये देशाला दुसरे पदक मिळाले आहे. नीतू घनघासने 45-48 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. तर, स्वीटी बुरा हिने 75-81 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. या दोघांशिवाय, निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनीही अंतिम फेरीत स्थान मिळवून किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.