फेडरर
ने केवळ शानदार पुनरागमन केले नाही, तर तो वेगळ्याच शैलीत खोळत आहे. पूर्वीच्या तुलनेत बेसलाईनच्या अधिक जवळून खेळत आहे. तो टॉप स्पिनचा चांगला उपयोग करीत आहे व चांगले फटकेही परतावून लावत आहे. त्यामुळे तो पुन्हा विश्वमानांकन पदावर सर्वात वयस्कर टेनिसपटू आरुढ असण्याचा पराक्रम आंद्रे आगासी याच्या नावावर आहे. रोजर फेडररने दुखापतीतून बरा झाल्यानंतर सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. फेडररने रविवारी वावरिकाला हरवून इंडिटन वेल्सचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतरचे त्याचे हे वर्षीचे दुसरे विजेतेपद आहे.