इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने सांगितले की, महिला सुपर लीग आणि महिला चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना या सुविधा मिळणार आहेत. यापूर्वी त्यांना किती रजा द्यायची हे क्लबवर अवलंबून होते आणि खेळाडूने क्लबसोबत किमान 26 आठवडे खेळणेही बंधनकारक होते. मात्र आता नव्या धोरणानुसार अशी कोणतीही सक्ती नाही. एवढेच नाही तर, कराराअंतर्गत दुखापत आणि आजारपणाचे कव्हरेजही जास्त असेल.