भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा प्रवास शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत संपला. सिंधूला पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुनजुंगकडून महिला एकेरी गटात पराभव पत्करावा लागल्याने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची मोहीम संपुष्टात आली. सुमारे तासभर चाललेल्या या सामन्यात 29 वर्षीय सिंधूचा 13-21, 21-16, 9-21 असा पराभव झाला.
इंडोनेशियाच्या आठव्या क्रमांकाच्या तुनजुंगने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले, तरीही सिंधूने दुसरा गेम जिंकण्यात यश मिळविले. आता उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित तुनजुंगचा सामना अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या एन से यंगशी होईल. पहिल्या गेममध्ये सलग आठ गुण घेत तुनजुंगने सहज विजय मिळवला.
त्यानंतर सिंधूने 11-10 अशी आघाडी घेतली. तिने सहज 19-15 ने आघाडी घेतली आणि लवकरच 21-16 ने जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, निर्णायक गेममध्ये ती गती कायम ठेवू शकली नाही आणि तुनजुंगने सामना जिंकून पुनरागमन केले. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू पॅरिस स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतली होती, त्यानंतर हा हंगाम तिच्यासाठी निराशाजनक ठरला आहे.