तिने गट-एम सामन्यात आपल्या खालच्या मानांकित खेळाडूचा 21-9, 21-6 असा पराभव केला. सिंधूने अवघ्या 29 मिनिटांत सामना जिंकला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या 10व्या मानांकित सिंधूचा बुधवारी गट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 75व्या मानांकित एस्टोनियाच्या क्रिस्टिन कूबाशी सामना होणार आहे.