बेंगळुरू बुल्सने PKL 9 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु PKL 10 मध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, बंगाल वॉरियर्स गुणतालिकेत 11व्या स्थानावर आहे. नवव्या सत्रात दोन्ही संघांमध्ये 2 सामने झाले आणि दोन्ही वेळा बंगाल वॉरियर्सने विजय मिळवला. मनिंदर सिंग बंगालचे नेतृत्व करणार आहे. बंगालसाठी कॅप्टन मनिंदर सिंग, श्रीकांत जाधव आणि शुभम शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत असतील, तर बेंगळुरू बुल्ससाठी भारत, सौरभ नंदल आणि सुरजीत महत्त्वाच्या भूमिकेत असतील.
बेंगळुरू बुल्स
सौरभ नंदल ( कर्णधार ), विकास कंडोला, सुरजीत सिंग, विशाल, भरत हुडा, नीरज नरवाल आणि अमन.
बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग (कर्णधार), श्रीकांत जाधव, आदित्य शिंदे, नितीन कुमार, शुभम शिंदे, वैभव गर्जे आणि श्रेयस.