PKL Day 2 :प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या दिवशी तीन सामने, सामने कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (16:01 IST)
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. लीगचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. बेंगळुरू येथील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियमवर आज सहा संघ खेळताना दिसणार आहेत. यू मुम्बाच्या संघाला पहिल्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर दिल्ली आणि यूपीच्या संघाने बाजी मारली होती. आज पटना पायरेट्स पुणेरी पलटन, गुजरात जायंट्स, तमिळ थलायवास, बंगाल वॉरियर्स आणि हरियाणा स्टीलर्स हे संघ मैदानात उतरतील. या सर्व संघांना मोठा विजय मिळवून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवायचे आहे.
 
प्रो-कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात 12 संघ सहभागी होत आहेत. जयपूर पिंक पँथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटन, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स, बंगाल वॉरियर्स, तमिळ थलायवास, तेलुगु टायटन्स, यू मुंबा, बेंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा हे संघ आहेत. पहिल्या फेरीत एकूण 66 सामने खेळवले जाणार आहेत. 
 
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी नव्हती. आयोजकांनी पूर्वार्धाचे (8 नोव्हेंबरपर्यंत) वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील सामने बेंगळुरू येथील श्री कांतीराव इनडोअर स्टेडियमवर खेळवले जातील. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहेत. अंतिम फेरीचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे.
 
प्रो कबड्डी लीग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केली जाईल. स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड, स्टार स्पोर्ट्स 1 बांगला, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स हिंदी HD आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वर थेट सामने पाहू शकता.
 
स्पर्धेदरम्यान दररोज संध्याकाळी 7.30 वाजता सामने सुरू होतील. पहिला सामना संपल्यानंतर दुसरा आणि नंतर तिसरा सामना खेळवला जाईल.
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती