मंगळवारी भारताच्या पारस गुप्ताने सनी वांगचा 5-0 असा पराभव करून एसीबीएस आशियाई 6-रेड स्नूकर चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आग्राच्या 29 वर्षीय क्यूइस्टने सिंगापूरच्या खेळाडूवर 5-0 (35-28, 44-9, 40-2, 53-12, 59-0) असा विजय नोंदवला.
पारसने यापूर्वी सकाळच्या सत्रात आयबीएसएफ वर्ल्ड ६ रेड स्नूकर चॅम्पियन कमल चावला याला 5-2 (45-0, 63-4, 36-19, 26-35, 41-34, 25-34, 37-0)असे पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.