प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल पुरुष दुहेरी संघाने शेफिल्ड, इंग्लंड येथे चार देशांच्या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत SL-3, SL-4 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भगतने एकेरी SL-3 प्रकारातही रौप्य पदक जिंकले. तसेच मिश्र दुहेरीत SL-3, SU-5 प्रकारात मनीषा रामदाससह रौप्यपदक जिंकले. कदमने एकेरी SL-4 प्रकारात कांस्यपदक पटकावले.
भगत आणि कदम ने भारतातील दीप रंजन बिसोयी आणि मनोज सरकारचा 21-17, 21-17 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.एकेरीत भगतला इंग्लंडच्या डॅनियल बेथेलकडून 8-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत भगत आणि रामदास यांना इंडोनेशियाच्या हिकमत रामदानी आणि लिनी यांच्याकडून21-17, 21-17 असा पराभव पत्करावा लागला.