नोव्हाक जोकोविच चॅम्पियन, 2022 मध्ये चौथे विजेतेपद जिंकले

सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (19:26 IST)
नोव्हाक जोकोविचने अस्ताना ओपन 2022 च्या अंतिम सामन्यात सित्सिपासचा पराभव करून या वर्षातील चौथे विजेतेपद पटकावले.ऑस्ट्रेलियन ओपनला वादामुळे मुकावे लागलेला जोकोविच या स्पर्धेनंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने अस्ताना ओपनच्या अंतिम सामन्यात त्सित्सिपासचा 6-3, 6-4 असा पराभव केला आणि स्पर्धेची तिसरी आवृत्ती जिंकली. 
 
जोकोविचने गेल्या आठवड्यात तेल अवीवमध्ये ATP 250 चे विजेतेपद पटकावले होते. त्याच्याकडे आता 2022 मध्ये ग्रँड स्लॅम विजेतेपदासह (विम्बल्डन ओपन) चार विजेतेपद आहेत. अस्ताना येथे शानदार विजयासह, जोकोविचने रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली आहे आणि राफेल नदालच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे.
 
पुनरागमनानंतर जोकोविचचा हा सलग नववा विजय ठरला. यादरम्यान त्याने फक्त एक सेट गमावला आहे, जेव्हा त्याला शनिवारी डॅनिल मेदवेदेवविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एक सेट गमवावा लागला होता. तथापि, दुखापतीच्या चिंतेमुळे मेदवेदेवने दुसऱ्या सेटच्या टायब्रेकच्या शेवटी अचानक सामन्यातून माघार घेतली. जोकोविचसाठी हे त्याचे 90 वे टूर-स्तरीय विजेतेपद होते. ओपन एरामध्ये 90 किंवा त्याहून अधिक एटीपी विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो नदाल आणि फेडरर यांच्यासोबत सामील झाला आहे.

अस्तानामधील विजेतेपदासह जोकोविच हा 19 वेगवेगळ्या देशांमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा टेनिसपटू ठरला. त्याच्या आधी रॉजर फेडररने ही कामगिरी केली आहे. जोकोविचने आतापर्यंत नेदरलँड्स, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पोर्तुगाल, कॅनडा, ऑस्ट्रिया, इटली, चीन, यूएई, सर्बिया, स्वित्झर्लंड, स्पेन, यूके, मोनॅको, कतार, जपान, इस्रायल, कझाकस्तान येथे विजेतेपद पटकावले आहेत. 
Edited By -Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती