दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या चोप्राने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की भालाफेक स्पर्धा पंचकुलाहून बेंगळुरूला हलवण्यात आली आहे. चोप्रा यांनी एनसी क्लासिक संघाच्या वतीने ट्विटरवर एक निवेदन पोस्ट करून स्पर्धा पुढे ढकलण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक येत्या काळात शेअर केले जाईल.
निवेदनात म्हटले आहे की, 'सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, एनसी क्लासिकचा प्राथमिक टप्पा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. खेळाडू, भागधारक आणि व्यापक समुदायाच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन विचार आणि सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला खेळाच्या एकत्रीकरणाच्या शक्तीवर विश्वास आहे. पण या कठीण काळात देशासोबत खंबीरपणे उभे राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. यावेळी आमचे सर्व कृतज्ञता आणि विचार फक्त आमच्या सशस्त्र दलांबद्दल आहेत जे आमच्या देशासाठी आघाडीवर आहेत. जय हिंद.