महान फुटबॉलपटू मॅराडोनाचा भाऊ ह्यूगो यांचे निधन

शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (22:20 IST)
दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाचा धाकटा भाऊ माजी फुटबॉलपटू ह्युगो मॅराडोना यांचे निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. इटालियन क्लब नेपोलीने त्याच्या मृत्यूची घोषणा केली. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.
डिएगोच्या आग्रहास्तव, नेपोलीने 1987 मध्ये एस्कोलीकडून ह्यूगोला कर्जावर घेतले. याशिवाय ते रिओ व्हॅलेकानो, रॅपिड व्हिएन्ना आणि जगातील इतर अनेक क्लबकडूनही खेळले. ते नेपल्समध्ये राहत होते. डिएगो मॅराडोना यांचे 13 महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती