लिओनेल मेस्सीच्या 'अश्रूचे ' टिश्यू पेपर विकले जातील, किंमत जाणून चकित व्हाल

शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (14:04 IST)
अलीकडेच फुटबॉल विश्वातील एका बातमीने सर्व फुटबॉल प्रेमींना आश्चर्यचकित केले. स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना फुटबॉल क्लबला निरोप दिल्याची बातमी होती. या बातमीने सर्वांना आश्चर्य वाटले. नंतर,अर्जेंटिनाच्या या फुटबॉलपटूने पत्रकार परिषद घेऊन या बातमीवर अधिकृत शिक्का मारला. पत्रकार परिषदेदरम्यान मेस्सीला अश्रू अनावर झाले. या दरम्यान, त्याने अश्रू पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू पेपर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. 
 
अर्जेंटिना माध्यमांच्या एका अहवालानुसार, मेस्सीशी संबंधित वस्तूंची किंमत गगनाला भिडत आहे. मेस्सीने वापरलेला टिश्यू पेपर 'मर्काडो लिब्रे' या लोकप्रिय वेबसाइटवर पोहोचला आहे, जिथे चाहत्यांना हा टिश्यू पेपर  1 दशलक्ष डॉलर मध्ये  मिळू शकतो. ' कॉम्प्लिट स्पोर्ट्स या दुसऱ्या वेबसाइटनुसार, त्या पत्रकार परिषदेनंतर, एका अज्ञात व्यक्तीने तो टिश्यू पेपर घेतला आणि एक ऑनलाईन जाहिरात पोस्ट केली की ती योग्य किंमत आल्यास ते विकले जाईल. 
 
मिनुटोउनो डॉट कॉमनुसार, केवळ मूळ टिश्यू पेपर विक्रीसाठी ठेवण्यात आला नाही तर त्याची प्रतिकृती देखील ऑनलाइन विकली जात आहे. मिलोंगा कस्टम, एक ऑनलाइन उपक्रम, एक संग्रहणीय वस्तू म्हणून मेसीच्या टिश्यू पेपरची  प्रतिकृती लाँच केली. त्याला प्लॅस्टिकच्या रॅपमध्ये, तसेच भावनिक मेस्सीचे चित्र लावून बंद केलेले होते. 
 
मर्कॅडो लिबर पृष्ठावर हा पेपर अद्याप उपलब्ध नाही. या जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरले. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्टार फुटबॉलपटू मेस्सी आता 'पॅरिस सेंट जर्मन' मध्ये सामील झाला आहे. मेसी 29 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर रोजी PSG साठी पदार्पण करू शकतो. लिओनेल मेस्सीने PSG सोबत दोन वर्षांचा करार केला आहे जो इतर फायद्यांसह त्याला प्रत्येक हंगामात 35 दशलक्ष युरो देईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती