भारतीय हॉकी संघाचा कोरोनामुळे चीन दौरा रद्द

शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (14:32 IST)
कोरोना व्हारसमुळे भारतीय महिला हॉकी संघाला आपला चीन दौरा रद्द करावा लागला आहे. आता हॉकी इंडियापुढे ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पर्यायी दौर्‍याचे आयोजन करण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. भारतीय संघ 14 ते 25 मार्च दरम्यान चीन दौर्‍यावर जाणार होता. मात्र, या रोगामुळे हादौरा रद्द करण्यात आला आहे.
 
भारतीय कर्णधार राणी रापालने सांगितले की, आम्ही चीन दौर्‍यावर जाणार होतो. मात्र, व्हायरसमुळे तो दौरा रद्द करणत आला. काही अन्य संघही उपलब्ध नाहीत कारण ते प्रो हॉकी लीग खेळत आहेत. हॉकी इंडिया आणि आमचे प्रशिक्षक व्यवस्था करत आहेत. ऑलिम्पिकची तयारी होण्यासाठी मोठ्या संघांविरुध्द खेळणे गरजेचे आहे. हा व्हायरस पसरल्यामुळे चीनमध्ये जिथे शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तिथे दुसर्‍या देशातील लोकांनाही या व्हारसची लागण झाली आहे. भारताची यावर नजर असून भारताने आपल्या  देशाचे 640 विद्यार्थी विशेष विमानाने चीनहून स्वदेशी आणले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती