नवी दिल्लीत सोमवारी होणाऱ्या भारतीय ऑलम्पिक असोसिएशन द्वारा समर्थित या स्पर्धेत जगभरातील एकूण 20 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी होणार आहे. भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान हे अ गटात आहे. तर महिला संघ इस्मालिक रिपब्लिक ऑफ इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया रिपब्लिकसह अ गटात आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीत पोहोचतील भारतीय पुरुषसंघ सोमवारी उदघाटन समारंभानंतर नेपाळविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल तर महिला संघ मंगळवारी त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाशी भिडणार आहे.
स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे नेत्तृत्व प्रतीक वायकर करणार असून प्रतीकने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले असून प्रतीक अल्टिमेट खोखो लीग मध्ये तेलुगू योद्धाचा कर्णधार आहे. तर संघाचे प्रशिक्षक अनुभवी अश्विनीकुमार शर्मा असतील. महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे करणार असून सुमित भाटिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
खो-खो विश्वचषक 2025 ची सुरुवात गट टप्प्याने होईल, त्यानंतर बाद फेरी आणि 19 जानेवारी रोजी अंतिम फेरी होईल. भारतीय पुरुष संघ खो-खो विश्वचषक 2025 मध्ये नेपाळ विरुद्ध 13 जानेवारी रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, त्यानंतर 14 जानेवारी रोजी ब्राझील विरुद्ध सामना होईल.
यानंतर 15 जानेवारीला पेरू आणि 16 जानेवारीला भूतानशी सामना होईल. जर ते पात्र ठरले तर उपांत्यपूर्व फेरी 17 जानेवारीला होईल, त्यानंतर उपांत्य फेरी 18 जानेवारीला होईल. पुरुष संघाचा अंतिम सामना 19 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, भारतीय महिला संघ 14 जानेवारीला दक्षिण कोरियाविरुद्ध, त्यानंतर 15 जानेवारीला इराण आणि 16 जानेवारीला मलेशियाशी सामना खेळून स्पर्धेला सुरुवात करेल . महिला संघाची उपांत्यपूर्व फेरी 17 जानेवारी रोजी होणार आहे.
खो खो संघ : प्रतिक वाईकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौतम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम. भारतीय महिला
खो-खो संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका. , नाझिया बीबी. स्टँडबाय: संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.