भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शाह यांनी अलीकडेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी बीसीसीआयमध्ये सचिव म्हणून अनेक मोठी कामे केली आणि जय शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. जय शाह यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बीसीसीआयला सचिवाची गरज होती. आता बीसीसीआयने या पदासाठी अनुभवी खेळाडूची निवड केली आहे. आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया हे जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे सचिव बनले आहेत.
बीसीसीआयने रविवारी विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. या बैठकीत नूतन सचिवाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभातेजसिंग भाटिया यांनीही या बैठकीत खजिनदारपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या दोघांनी सचिव आणि खजिनदार पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर सैकिया यांची बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ही नियुक्ती केली होती, ज्यांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून कार्यवाहक सचिवपद सैकियाकडे सोपवले