एका परदेशी खेळाडूने गोंदवले हिंदी भाषेत टॅटू

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:42 IST)
आपल्या शरीरावर हिंदी भाषेत टॅटू  काढणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव सामिल झाले आहे. ईंग्लिश प्रीमीयर लीगमध्ये आर्सेनालकडून खेळणारा ब्रिटीश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोटने आपल्या पाठीवर भगवान शिवाचे स्मरण करत टॅटू बनवला आहे. याआधी इंग्लंडचा स्टार फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमने त्याच्या दंडावर पत्नी व्हिक्टोरीया असे लिहीले होते. तर रशियाची टेनिस स्टार खेळाडू मारिया शारापोवा हिने मानेवर हिंदीत जीत असे लिहिले होते.
 
आता इंग्लिश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोट याने आपल्या पाठीवर ‘ओम नमः शिवाय’ मंञाचा टॅटू बनवून घेतला आहे. आर्सेनाल टीम इंग्लिश प्रीमीयर लीग किताब जिंकेल किंवा नाही हा विषय वेगळा आहे. माञ, वाल्कोटने आपल्या नव्या टॅटूने त्याने लाखो फुटबॉल चाहत्यांची मने नक्कीच जिंकली आहेत. हा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत वाल्कोट आपली पाठ दाखवत, आपले मन मोकळं करा, भीती, द्वेषाला काढून टाका. जेणेकरून कधीही न संपणा-या आनंदाचा अनुभव घेऊ शकाल. असे म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा