Football: भारतीय फुटबॉल संघ व्हिएतनाममध्ये खेळणार दोन सामने, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार

शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (19:55 IST)
जून 2022 मध्ये कोलकाता येथे झालेल्या 2023 AFC आशियाई चषक पात्रता फेरीनंतर भारतीय पुरुष फुटबॉल संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ दोन मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी व्हिएतनाम दौऱ्यावर जाणार आहे. तिथे 24 आणि 27 सप्टेंबरला संघ दोन सामने खेळणार आहे. भारतीय संघ हंग थिन्ह मैत्रीपूर्ण फुटबॉल स्पर्धेत आधी व्हिएतनाम आणि नंतर सिंगापूरविरुद्ध खेळणार आहे.
 
आगामी आशियाई चषक स्पर्धेतील संघाच्या मोहिमेची तयारी लक्षात घेऊन या मैत्रीपूर्ण सामन्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी आशियाई चषक स्पर्धा होणार आहे. 23 सदस्यीय संघाची कमान अनुभवी सुनील छेत्रीकडे आहे. फिफा क्रमवारीत यजमान व्हिएतनाम 97व्या स्थानावर आहे. ते या स्पर्धेतील सर्वोच्च क्रमवारीतील संघ आहेत. भारत104व्या तर सिंगापूर 159व्या क्रमांकावर आहे.
 
सामने कुठे बघायचे?
भारताचे दोन्ही सामने युरोस्पोर्ट आणि युरोस्पोर्ट एचडी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातील. डिस्कव्हरी+ अॅप वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
 
स्पर्धेसाठी भारतीय संघाचे
गोलरक्षक: गुरप्रीत सिंग संधू, धीरज सिंग मोइरंगथेम आणि अमरिंदर सिंग.
 
बचावपटू: संदेश झिंगन, रोशन सिंग नौरेम, अन्वर अली, आकाश मिश्रा, चिंगलेनसाना सिंग कोनशाम, हरमनजोत सिंग खाबरा आणि नरेंद्र.
 
मिडफिल्डर: लिस्टन कोलाको, मुहम्मद आशिक कुरुनियन, दीपक टांगरी, उदांता सिंग कुमाम, अनिरुद्ध थापा, ब्रॅंडन फर्नांडिस, यासिर मोहम्मद, जॅक्सन सिंग थौनाओजम, सहल अब्दुल समद, राहुल कन्नोली प्रवीण आणि लल्लियांझुआला छंगटे.
 
फॉरवर्ड: सुनील छेत्री आणि ईशान पंडिता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती