चीनने रविवारी इंडोनेशियाच्या 3-0 असा पराभव करत 16व्यांदा उबेर कप विजेतेपद पटकावले.
ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने एकेरीच्या लढतीत ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा 21-7, 21-16असा पराभव करत चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चेन किंगचेन आणि जिया यिफान जोडीने दुहेरीच्या सामन्यात सिती फादिया सिल्वा रामधंती आणि रेबेका सुगियार्तो यांचा 21-11, 21-8 असा पराभव करून चीनला 2-0 ने आघाडीवर नेले.यानंतर दुसऱ्या एकेरीत इंडोनेशियातील किशोर एस्टर नुरुमी ट्रायने पहिला सेट 21-10 असा जिंकला, पण हि बिंगजियाओने पुनरागमन करत 21-15, 21-17 असा विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले.