राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती आर्मीची जास्मिन लांबोरिया हिने महिलांच्या 60 किलो वजनी गटात वर्चस्व गाजवले आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती हरियाणाची मनीषा मौन हिचा 5-0 असा पराभव केला. साक्षीने आर्मीसाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. तिने हिमाचल प्रदेशच्या विनाक्षीचा 5-0 असा पराभव केला.