भारताच्या पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने विश्वचषक स्टेज-I मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी या त्रिकुटाने अंतिम फेरीत फ्रान्सचा एका गुणाने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. मात्र, भारताचे दुसरे पदक जिंकणे हुकले.
भारतीय पुरुष तिरंदाजांच्या त्रिकूटाने तिसऱ्या फेरीतून पुनरागमन केले. भारताने 60 धावा केल्या आणि तिसरा सेट 60-58 असा जिंकला. यानंतर फ्रान्सची आघाडी केवळ एका गुणावर कमी झाली. भारताचा स्कोअर 173 आणि फ्रान्सचा 174 होता. चौथ्या फेरीत भारताने 59 आणि फ्रान्सने 57 धावा केल्या आणि भारतीय संघ फ्रान्सच्या पुढे गेला.