हॉकीत भारतीय मुलींना कास्य

वेबदुनिया

सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (12:20 IST)
गतविजेत्या कोरियाचा 2-0ने पराभव करून 18 वर्षांखालील मुलींच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताने कास्य पदकाची कमाई केली. नवज्योत कौरने 38 आणि अनुपा बार्लाने 49व्या मिनिटाला गोल केले. पहिल्या मिनिटापासून भारतीय मुलींनी या लढतीवर वर्चस्व राखले होते. यापूर्वी 2005 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. विजय संघ आज मायदेशी परतणार आहे.

वेबदुनिया वर वाचा