सेरेना आऊट

वेबदुनिया

मंगळवार, 24 जानेवारी 2012 (12:24 IST)
ND
अखेरच्या टप्प्याकडे निघालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. रशियाच्या एकॅटेरिना माराकोव्हाने स्पर्धेतील पहिला खळबळजनक निकाल नोंदवताना सोमवारी चौथ्या फेरीत माजी विजेत्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला सरळ सेटमध्ये पराभूत केले.

विश्व माकांकनात 56 व्या स्थानी असलेल्या माराकोव्हाने सेरेनाच्या वेगवान खेळाला चोख प्रत्युत्तर देत ही प्रतिष्ठेची लढत 6-2, 6 -3 अशी जिंकली आणि प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर या पराभवामुळे सेरेना विल्यम्सची मेलबोर्नवर सलग 17 विजयांची मालिका खंडित झाली.


वेबदुनिया वर वाचा