सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत

वेबदुनिया

शनिवार, 24 सप्टेंबर 2011 (16:24 IST)
येथील जपान खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल शनिवारी पराभूत झाली. जर्मनीची ज्युलीयन शँक हिने सायनाला २१-१९, २१-१० असे हरवले.

धडाकेबाज खेळ करत उपांत्य फेरीपर्यत पोचलेल्या सायनाला शँकने या फेरीत मात्र कोणतीही संधी दिली नाही. अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये शँकने २१-१९ तर दुस-या गेममध्ये २१-१० असा शानदार खेळ केला. या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा