सायना नेहवालने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले

शनिवार, 4 ऑगस्ट 2012 (19:47 IST)
WD
WD
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये चीनच्या झिन वँग हिला हरवत कांस्य पदक जिंकले. सायनाने पदक जिंकण्याच्या इराद्याने दमदार खेळ केला. वेगवान खेळ करत तीने चीनच्या वँग हिला पूर्णपणे थकवून टाकले. शेवटी घोट्याच्या दुखापतीने वँगने माघार घेतली आणि कांस्य पदकावर सायनाने नांव कोरले.

खेळ संपला तेव्हा स्कोअर १८-२१, ०-१ होता. वँग दुखणे असह्य झाल्याने कोर्टवर कोसळली. सायना वँग कडे चालत गेली आणि तिचे सांत्वन केले. जागतिक क्रमवारीत सायना ५ व्या क्रमांकावर असून वँग ही दुसरी मानांकित आहे.

भारतास ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे हे पहिले पदक आहे. ऑलिम्पिकसाठी सायनाने खूप कठिण परिश्रम घेतले होते. तिने दोन एंडॉर्समेंट नाकारून पूर्णपणे तयारीवर लक्ष केंद्रित केले होते. तंदुरूस्तीवर तीने खूप परिश्रम घेतले होते. याचाच परिणाम कडव्या संघर्षातही ती फिट राहिली.

वेबदुनिया वर वाचा