भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:51 IST)
कुस्तीत दोन व थाळीफेकमध्ये एक

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कुस्तीपटू बबिताकुङ्कारी (55 किलो गट) आणि योगेश्वर दत्त (65 किलो गट) यांनी सुवर्णपदक जिंकले. दोघांनीही फ्रिस्टाइल कुस्ती प्रकारात हे यश संपादन केले. विकास गौडा याने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
 
महिला कुस्तीपटू बबिताकुमारी हिने कॅनडाची कुस्तीपटू ब्रिटनी लेवर्ड हिला 9-2 ने मात दिली. बबिताने फ्रिस्टाइल कुस्ती प्रकारात, 55 किलो वजनी गटात हे यश मिळविले. दिल्लीत 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत बबिताने रौप्यपदक जिंकले होते. त्यावेळी ती 51 किग्रॅ वजनी गटात खेळली होती.
 
यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने राष्ट्रकुल स्पर्धेत 65 किलो वजनी गटात फ्रिस्टाइल प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
 
गीतीका जाखर हिला 63 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्पदक मिळाले आहे. तर पवनकुमारने 86 किलो वजन गटात कांस्पदक मिळविले आहे.
 
भारताच्या विकास गौडा याने थाळीफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने 63.64 मीटर लांब थाळी फेकली. भारताला मिळालेले हे 13 वे सुवर्णपदक आहे. 

वेबदुनिया वर वाचा