स्वीस ओपन स्पर्धेत साइनाला विजेतेपद

वेबदुनिया

सोमवार, 19 मार्च 2012 (16:12 IST)
WD
गतविजेत्या साइना नेहवालने स्वीस ओपन बॅ‍डमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या शिशीयांग वँग हिच्यावर 21-19, 21-16 असा विजय मिळवत विजेतेपद सलग दुसर्‍या वर्षी राखले.

स्वित्झर्लंडमधील बॅसेल येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साइनाचे वर्चस्व राहिले. वँगला तिने पहिला गेम 21-19 असा घेतला. दुसर्‍या ओपनमध्ये वँगने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र साइनाच्या आक्रमक खेळापुढे ती हतबल ठरली. दुसरा गेम 21-16 असा घेत साइनाने विजेतेपद शिक्काबोर्तब केले.

वेबदुनिया वर वाचा