लिओनेल मेस्सीच्या पायाचा विमा 560 कोटींचा

बुधवार, 29 जून 2016 (12:08 IST)
कोपा अमेरिका कपमध्ये आपल्या देशाचा पराभव होताच फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणार्‍या मेस्सीने त्याच्या पायांसाठी तब्बल 560 कोटी रूपयांचा विमा उतरविला असून त्यासाठी त्याला दरवर्षी 5 ते 7 कोटी रूपये हप्ता भरावा लागतो. फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंत दोन नंबरवर असलेल्या मेस्सीचे खर्च आणि शौक शाही आहेत.
 
मेस्सी वर्षाला किती कमाई करतो हे ऐकले तर थक्क व्हायला होईल. दरवर्षी फुटबॉलमधून तो 5.34 कोटी डॉलर्स म्हणजे 360 कोटी रूपये कमावतो. शिवाय जाहिरातीतून 201 कोटी रूपये कमावतो. त्याच्याकडे 1.60 कोटी डॉलर्स किमतीच्या मसरतीसह ऑडी आर एट स्पायडर, फेरारी स्पायडर या सारख्या अनेक लग्झरी कार्स आहेत. बाहेरून फुटबॉलच्या 
 
मैदानासारखे दिसणार्‍या आलिशान महागडय़ा घरात तो राहतो. त्याचे हे घर बार्सिलोना येथे आहे तर आणखी एक आलिशान घर अर्जेटिनातही आहे. मेस्सी टाटा मोटर्सचा ब्रँड अँबेसिडर आहे आणि निवृत्तीनंतरही तो हे काम करणार आहे. टाटांच्या निमित्ताने मेस्सी भारताशी जोडला गेला आहे आणि टाटा कंपनी देशातील युवकांना अधिक संख्येने आकर्षित करून घेण्यासाठी मेस्सीची मदत घेत आहे.

वेबदुनिया वर वाचा