नदाल इंडियन वेल्स, मियामी स्पर्धेला मुकणार?

WD
स्पेनचा स्टार टेनिसपटू रफेल नदाल पुढील महिन्यात होणारी एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स सीरिज, मियामी टेनिस स्पर्धा, तसेच इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

कारकिर्दीत 11 ग्रँडस्लम विजेतेपदे पटकावणार्‍या नदालने सात महिन्यांनंतर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत अलीकडेच टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. फ्रेंच ओपनची तयार करण्यासाठी त्याने आगामी स्पर्धांमधून माघार घेतली.

वेबदुनिया वर वाचा