चव दक्षिणेची : उत्तप्पा

साहित्य  : चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या , मीठ.

कृती  : रात्री तांदूळ, उडदाची डाळ व मेथ्या हे वेगवेगळे भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ उपसून व कुटून, पीठ चाळून घ्यावे. उडदाची डाळ व मेथ्या उपसून बारीक वाटावे व हा वाटलेला गोळा व दोन-तीन चमचे मीठ तांदळाच्या पिठात घालून व पुरेसे पाणी घालून, पीठ कालवून, दहा-बारा तास ठेवून द्यावे. उत्तप्पा करावयाच्या वेळी पीठ पातळसर कालवून घ्यावे. नंतर तवा तापत ठेवून, तो तापल्यावर त्याच्यावर तेल किंवा तूप सोडून, त्यावर तयार केलेल्या पिठाची जाडसर धिरडी घालावीत. 
 
उत्तप्पा खावयास देताना बरोबर ओल्या डाळीची किंवा इतर दुसरी कोणतीही पातळसर चटणी द्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती