Summer Special : आंबट-गोड कैरीचा भात

साहित्य: २ वाट्या जुना तांदूळ,  ४ सुक्या लाल मिरच्या,  २ चमचे उडीद डाळ,  १ चमचा हरबरा डाळ,  पाव वाटी भाजलेले शेंगदाणे,  पाव वाटी पुदिना पान,  ३ चमचे कैरीचा कीस,  कढीलिंब, कोथिंबीर,  जीर, मोहरी, हळद,  साखर, हिंग, मीठ, तेल. 
 
कृती: सर्वप्रथम  तांदूळ धुवून निथळत ठेवावेत नंतर  कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवावे व  त्यात जिरे-हिंग, कढीलिंब घालून फोडणी करावी.  नंतर त्यात तांदूळ आणि मीठ घालून परतावं.  अडीच वाट्या गरम पाणी घालून मऊ, मोकळा भात शिजवावा.   भातामध्ये हळद घालू नये.  पुदिना पान आणि थोडी कोथिंबीर एकत्र करून वाटून घ्यावी. भात मोकळा करून थंड होण्यास ठेवावा.
 
भात थंड झाल्यावर त्यावर कैरीचा कीस, वाटलेला पुदिना आणि चवीला साखर घालावी.  कढईमध्ये तीन चमचे तेलाची मोहरी, कढीलिंब, हळद, शेंगदाणे घालून फोडणी करावी.  ही फोडणी भातावर घालावी.  भात नीट मिसळून घ्यावा.  आंबट-गोड चवीचा हा भात पुन्हा गरम करू नये.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती