ओणम स्पेशल - अवियल

सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (09:22 IST)
अवियल मध्ये बहुतेक सर्व उपलब्ध स्थानिक भाज्या घातल्या जातात.
साहित्य : 1 गाजर, 3 फरसबी शेंगा, 2 कच्ची केळी, 1 मध्यम आकाराचे वांगे, 100 ग्रॅम काकडी, 100 ग्रॅम पडवळ, 100 ग्रॅम सुरण, एक शेकटाची शेंग, 2 कप खोवलेला नारळ, एक चमचा जिरे आणि 6 हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्या.
2 कप खोवलेला नारळ 
एक चमचा जिरे
6 हिरव्या मिरच्या
2 चमचे दही आणि 
¼ कप खोबरेल तेल  
मीठ, अर्धा चमचा हळद, कोथिंबिर 
 
कृती
सर्वप्रथम भाज्यांचे लांब तुकडे करून घ्या. त्यांना हळद घालून उकळवा आणि पुरेसे पाणी घाला. यात बारीक वाटलेला नारळ घाला. पाच मिनिटे शिजवा. मीठ घाला. आचेवरून काढा आणि दही घालून मिसळा आणि खोबरेल तेल घाला. चांगले मिसळा. गरम-गरम वाढा.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती