Biryani : मलबार चिकन बिर्याणी

साहित्य : बिर्याणी मसाला (मलबार), १ छोटे दगडफूल, ४ वेलची, ४ लवंग, २ एक इंच दालचिनी, २ जावित्री / जायत्रीच्या काडय़ा/तुरे, पाव टी स्फून जायफळ पावडर, अर्धा टी स्पून शाही जिरे, १ टी स्पून बडीशेप, लाल मिरची, अर्धा टी स्पून काळी मिरे
 
ग्रेव्हीसाठी साहित्य : ३ ते ४ चमचे तूप, काजू, थोडे मनुके, अर्धा ते पाऊण कप उभे चिरलेले कांदे तळण्यासाठी, अर्धा कप कांदे चिरलेले ग्रेव्हीसाठी, २ चमचे आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा किलो चिकन, पाव टी स्पून हळद, अर्धा कप टोमॅटो, मीठ चवीनुसार, २ चमचे दही, पाव कप चिरलेला पुदिना, पाव कप चिरलेली कोथिंबीर
 
बिर्याणी साहित्य : २ कप जिरेाळ / कैमा तांदूळ (केरळी दुकानात मिळतो) अन्यथा बासमती वापरला तरी चालतो, २-३ चमचे तूप, १ तेज पत्ता, १ दगडफूल, ४ वेलची, १ इंच दालचिनी, पाव चमचा बडीशेप, मीठ चवीनुसार, साडेतीन कप गरम पाणी
 
बिर्याणी थराकरिता साहित्य : पाव ते अर्धा टी स्पून केरली गरम मसाला, मूठभर पुदिना व कोथिंबीर, एक चमचा तूप, गुलाबजल
 
कृती :
सर्वप्रथम सर्व मसाल्याची पावडर करून घ्या. एका कढईत तूप गरम करून काजू व मनुके तळून बाजूला काढून ठेवा. त्यातच उभा चिरलेला कांदा, क्रिस्पी परतून घ्या व बाजूला काढून ठेवा. आता तुपावर ग्रेव्हीसाठी चिरलेला कांदा गुलाबीसर होईपर्यंत परता. त्यात आले, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या. त्यात चिकन टाकून २-३ मिनिटे परता. त्यात हळद व बिर्याणी मसाला टाकून परतून घ्या. टोमॅटो, दही, मीठ टाकून परत नीट २-३ मि. परता. मंद गॅसवर चिकन शिजवून घ्या. मधून मधून चिकन खाली लागू नये म्हणून हलवत रहा.
 
चिकन ग्रेव्ही तयार झाली की बाजूला ठेवा. या ग्रेव्हीतही चिकन ८०% शिजवा त्यानंतर जर केरळी जिरेसाळ तांदूळ असेल तर तो भिजवून ठेवायची गरज नाही पण बासमती तांदूळ वापरणार असाल तर ३० मि. भिजवून, पाणी वैरून घ्या. त्यानंतर तुपामध्ये दिलेले मसाले टाकून परता, त्यामध्ये तांदूळ टाकून परता. त्यामध्ये गरम पाणी टाकून भात ९०टक्के शिजवून घ्या.
 
यानंतर ९०टक्के शिजलेला भात व चिकन ग्रेव्ही थर लावून घ्या. दोन थरांमध्ये तळलेला कांदा, पुदीना, कोथिंबीर, काजू व मनुके पसरावेत. तसेच तुपात गुलाबजल टाकून तेदेखील शिंपडावे. त्यानंतर झाकण ठेवून त्यावर पिठाची वळकटी लावून गच्च बंद करावे. जाड तव्यावर पातेले ठेवून मंद आचेवर १२ ते १५ मिनिटे ठेवावे. ही मलबार बिर्याणी तुम्ही कांद्याच्या दह्य़ातील रायत्याबरोबर सव्‍‌र्ह करू शकता.

वेबदुनिया वर वाचा