चायनीज डोसा डिलाइट

ND
साहित्य : 1 कप उडदाची डाळ, 3 कप तांदूळ, मीठ चवीनुसार, 1 कप भाज्या (पत्ताकोबी, सिमला मिरची, गाजर, कांद्याची जुडी), 1/4 कप मोड आलेले कडधान्य, आवश्यकतेनुसार तेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1/2 चमचा काळे मिरे पूड.

कृती : सर्वप्रथम तांदूळ व उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी डाळी वाटून त्यात मीठ घालून फरमेंट होण्यासाठी ठेवावे. डोसाच्या आतील सारण भरण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट घालून त्यात सर्व भाज्या, मोड आलेले कडधान्य घालून चांगले परतून घ्यावे. काही वेळा नंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर, मीठ, काळेमिरे पूड घालून 2 मिनिट अजून शिजवावे. तयार घोळ नॉनस्टिक तव्यावर घालून त्याचे डोसे तयार करावे. तयार केलेले सारण डोस्यात घालून डोसे तयार करावे. चायनीज डोसे डिलाइट तयार आहे, या डोस्याला चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा