मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका महिन्यापर्यंत चालणार्या सिंहस्थ (कुंभ) मेळ्याचे दुसरे शाही स्नान सोमवारी पहाटे सुरू झाले आहे. या शाही स्नानाची सुरुवात करत जुना अखाडाच्या नागा साधूंनी हर-हर महादेवाचा जल्लोष करत पवित्र शिप्रेत प्रवेश केला. सूर्योदयाच्या आधीपासून ते दुपारपर्यंत साधूंच्या शाही डुबकीसाठी रामघाटाला तयार केले आहे. स्नानात भाग घेण्यासाठी भाविकांचा सैलाब येथे आलेला आहे. हा स्नान आज अक्षय तृतीया असल्यामुळे अधिक शुभ मानला जात आहे. असा अंदाज लावण्यात येत आहे की किमान 25 लाख भाविक या प्राचीन नगरीत आलेले आहे.