श्राद्ध पक्ष : 16 दिवस शुभ कार्य वर्जित का?

श्राद्धपक्षाचा संबंध मृत्यूशी आहे म्हणून हा काळ अशुभ मानला जातो. जसे आपल्या कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर आम्ही शोकाकुल असतो आणि आपले इतर शुभ, नियमित, मंगल, व्यावसायिक कार्यांना विराम देतो, तोच भाव पितृपक्षाशी निगडित आहे.   
 
या काळात आम्ही पितर आणि पितर आमच्याशी जुळलेले असतात. म्हणून इतर शुभ-मांगलिक शुभारंभ सारख्या कार्यांपासून दूर राहून आम्ही पितरांप्रती पूर्ण सन्मान आणि त्यांच्याप्रती एकाग्रता बनवून राखतो.  
 
 
श्राद्ध पक्षात कावळे-कुत्रे आणि गायीचे महत्त्व   
 
* श्राद्ध पक्षात पितर, ब्राह्मण आणि कुटुंबियांशिवाय पितरांच्या निमित्त गाय, श्वान आणि कावळ्यांसाठी घास काढण्याची परंपरा आहे.  
 
* गायींमध्ये देवतांचा वास असतो, म्हणून गायीचे महत्त्व आहे.   
 
* श्वान आणि कावळे पितरांचे वाहक आहे. पितृपक्ष अशुभ असल्यामुळे अवशिष्ट खाणार्‍यांना घास देण्याचा विधान आहे.  
 
* दोघांपैकी एक भूमिचर आहे तर दुसरा आकाशचर. चर अर्थात चालणारा. हे दोन्ही गृहस्थांच्या जवळ आणि सर्वठिकाणी आढळतात.  
 
* श्वान जवळ राहून सुरक्षा प्रदान करतो आणि निष्ठावान मानला जातो म्हणून पितृचा प्रतीक आहे.  
 
* कवळ्यांना गृहस्थ आणि पितृमध्ये श्राद्धात दिलेले पिंड आणि जलवाहक मानले जातात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती