श्राद्ध पक्षात स्वयंपाक करताना घ्यावयाची काळजी

मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (09:27 IST)
पितृ पक्षात पितरांसाठी तरपण केल्याचे महत्त्व असल्याचे सर्वांना माहित असेल. तसेच या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण पितृ पक्षात पितरांचे तर्पण केले जाते. 
 
पितृ पक्षात पितरांची आठवण केली जाते-
विशेष म्हणजे, पितृ पक्षात आपल्या पितरांची आठवण काढली जाते, त्यासाठी त्यांचा आत्मेच्या शांती साठी काही विधी केल्या जातात. या वेळी काही विशेष काळजी घ्यावयाची असते. हिंदू पौराणिक ग्रंथात आणि ज्योतिषी शास्त्रात पितृदोषाचा ही उल्लेख केलेला आढळतो. असे मानले जाते की पितरांच्या रागापोटी आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागते. 
 
श्राद्ध पक्षात केले जाणारे कामं -
अशी आख्यायिका आहे की श्राद्ध पक्षात आपले सर्व पितरं पृथ्वीवर येतात, म्हणून पितृ पक्षात तर्पण आणि श्राद्धासह देणगी देण्याचे देखील महत्व आहे. असे मानले जाते की असे केल्याने पितरं प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. 
 
श्राद्ध पक्षात स्वयंपाक करताना ही सावधगिरी बाळगा -
श्राद्ध पक्षात जे अन्न शिजवले जाते, ते प्रसाद म्हणून असतं. या वेळी अन्न अगदी सोप्या आणि शुद्ध पद्धतीने तयार करावं. असे न केल्याने पितर अन्नाला ग्राह्य करीत नाही आणि आपणास श्राद्ध पूजेचे पुण्य लाभत नाही. श्राद्धाच्या जेवणात खीर आणि पुरी आवश्यक असते. स्वयंपाक करताना गंगेचे पाणी, दूध, मध, कुश आणि तीळ सर्वात महत्वाचे असते. तीळ जास्त असल्याने त्याचे फळ जास्त मिळतं. तीळ श्राद्धाचे पिशाचांपासून संरक्षण करतात.
 
श्राद्ध पक्षात चुकून देखील हे अन्न शिजवू नये- 
श्राद्ध पक्ष आणि पितृ पूजेत मोहरी, काळ्या मोहरीची पाने, शिळे आणि खराब झालेले अन्न, हरभरा, मसूर, उडीद, कुळीथ, सातू, मुळा, काळे जिरे, कांचनार, काकडी, काळे उडीद, काळे मीठ, दुधी, कांदा आणि लसूण, फळं आणि मेवे हे चुकूनही वापरू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती